Bailahongala

निलगिरीचे झाड पडून घराचे नुकसान

Share

बैलहोंगल तालुक्यातील गरजूर गावात मुसळधार पावसात येथील घरावर निलगिरीचे झाड उन्मळून पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे.

बैलहोंगल तालुक्यातील गरजूर येथील सिद्राम तलवार यांच्या घरावर निलगिरीचे झाड कोसळले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसून संसारोपयोगी साहित्याचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

Tags: