Athani

शेतातील खड्ड्यात पडून आठ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू

Share

बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील मलाबाद गावातील शाळकरी मुलीचा शेतातील खड्ड्यात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला आहे. शेळ्यांना पाणी देण्यासाठी शेत तलावात जात असताना या मुलीचा पाय घसरून पाण्यात पडल्याने तिला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या मलाबाद गावातील अन्विता सत्यप्पा खोत हिचा पाय घसरून खड्ड्यात पडल्याने मृत्यू झाला. यावेळी तिला वाचविण्यासाठी तिचा भाऊ आण्णाप्पा विठ्ठल खोत यानेही पाण्यात उडी मारली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तोही बुडू लागला. हि बाब या भागात उपस्थित असणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी दोघांनाही पाण्याबाहेर काढून वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र अन्विताचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तर अण्णाप्पा खोत याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याप्रकरणी अथणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: