Belagavi

जगदीश शेट्टर यांनी बसवेश्वर बँकेच्या संचालकांची घेतली भेट

Share

सुरेश अंगडी यांनी बेळगावच्या विकासासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांच्यासमवेत आपणदेखील एकत्र काम केले. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपाला साथ द्या असे आवाहन भाजपचे बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी केले.

भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव येथील बसवेश्वर बँकेत जाऊन संचालकांची भेट घेतली. बसवेश्वर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी जगदीश शेट्टर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी राज्य भाजप उपाध्यक्ष अनिल बेनके म्हणाले की, पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जगदीश शेट्टर यांना मतदान करा, बेळगाव जिल्हा पालक मंत्री म्हणून जगदीश शेट्टर यांनी काम केले आहे, त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले

 

यावेळी जगदीश शेट्टर म्हणाले की, बेळगावातील प्रसिद्ध बँक म्हणून बसवेश्वर बँकेचे नाव घेतले जाते. गेल्या ३० वर्षांपासून बेळगावकरांच्या सेवेत हि बँक आहे. आजवर सुरेश अंगडी यांच्यासमवेत बेळगावच्या विकासासाठी आम्ही एकत्र काम केले आहे. या भागाच्या विकासासाठी विधानसभेत आवाज उठवण्याचे काम केले आहे. बेळगावातील विकासकामे सुरू ठेवण्यासाठी मी कार्यरत आहे. बेळगाव शहर सुंदर करण्याचा माझा मानस असून हा मतदारसंघ आदर्श बनवण्याचा संकल्प मी केला आहे. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला मत द्या , असे आवाहन शेट्टर यांनी केले.

Tags: