Athani

अथणी तालुक्यातील ऎगळी गावात तणाव

Share

अथणी तालुक्यातील ऎगळी गावातील सार्वजनिक विहिरीतील पिण्याच्या पाण्यावरून झालेल्या किरकोळ वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आयपीएस अधिकाऱ्यांसह १४ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सार्वजनिक विहिरीचे पाणी वापरणाऱ्या ऎगळी गावातील सैदाप्पा गडादि कुटुंबियाला आक्षेप घेण्यावरून झालेल्या किरकोळ वादावादीचे पर्यवसन हाणामारीत झाले. यासंदर्भात आयपीएस अधिकारी रवींद्र गडादि यांच्यासह १४ जणांनी आवाज उठवला तसेच आयपीएस गडादि यांनी तक्रारदाराच्या कुटुंबाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत संतप्त कुटुंबाने ऎगळी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास याप्रकरणी सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

Tags: