Belagavi

मृणाल हेब्बाळकरांनी जीभ सांभाळून बोलावं : खास. अंगडी

Share

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांचा मतदार दारुण पराभव करतील, हेब्बाळकर यांच्यावर खोट्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया आज खासदार मंगला यांनी दिली.

बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, काँग्रेसने केलेला विश्वासघात आणि हिंदुविरोधी वर्तन मतदारसंघातील जनता विसरलेली नाही, घरच्या मुलीला दिलेल्या वागणुकीचा धडा घरच्या मुलाला शिकवला जाईल. गेल्या 20 वर्षात आम्ही 16 हजार कोटींचे अनुदान आणून बेळगावचा विकास केला आहे. परंतु काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर पराभवाच्या हताशपणाने बोलत आहेत, असा टोला खास. अंगडी यांनी लगावला.

सुमारे ९२७ कोटी रुपयांच्या अनुदानातून बेळगाव, कित्तूर आणि धारवाड रेल्वे निर्मितीसाठी केंद्रसरकारने परवानगी दिली आहे. सुरेश अंगडी यांनी आपल्या कार्यकाळात १०० कोटींचे अनुदान मंजूर करून चार रेल्वे ओव्हर ब्रिजची निर्मिती केली. २१० कोटी रुपयांच्या निधीतून मध्यवर्ती रेल्वेस्थानकाचा विकास, ते ३६०० कोटी रुपयांच्या निधीतून रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण केले. परंतु विरोधकांकडून सुरु असलेले हीन पातळीवरील राजकारण निषेधार्थ आहे असे त्या म्हणाल्या.

माझ्या कार्यकाळात अनेक विकासकामे झालेली आहेत. मात्र अशा पद्धतीने खालच्या पातळीवरील राजकारण करणे योग्य नाही असा टोला त्यांनी मृणाल हेब्बाळकरांना लगावला. माझ्या मार्यकाळात बेळगाव शहरातील रिंग रोड च्या कामकाजाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत चालना देण्यात आली. अनुदान मंजूर करून बेळगावचा विकास झाला परंतु सोशल मीडियाच्या चुकीचा वापर करून अंगडी कुटुंबीयांविरोधात खोटे आरोप करण्यात येत असल्याची टीका मृणाल हेब्बाळकरांविरोधात खासदारांनी केली.

यावेळी बोलताना भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके म्हणाले, सुरेश अंगडी यांचे नाव ऐकले की लोकांच्या मनात विकासाचा प्रणेता असा विचार येतो. त्यांच्या प्रयत्नांमुळे बेळगावला गोल्डन मेथोडिस्ट चर्च, राणी चन्नम्मा विद्यापीठ मिळून बेळगाव राज्याची दुसरी राजधानी बनली. हजारो कोटी रुपये खर्चून स्मार्ट सिटीची कामे झाली आहेत. सर्वांच्या विनंतीनुसार आंबेडकर भवन बांधण्यात आले. विमानतळाचा विस्तार होत आहे. असे सांगत अनिल बेनके यांनी काँग्रेसविरोधात संताप व्यक्त केला.

या बैठकीला भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, नगरसेवक हनुमंत कोंगाली आदी उपस्थित होते.

Tags: