Belagavi

न्यायालय संकुलात जगदीश शेट्टर यांनी केली मतयाचना

Share

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हायला हवेत. मोदी सरकारच्या कार्यकाळातील 10 वर्षात एकही भ्रष्टाचार झालेला नाही. मात्र युपीए सरकारच्या काळात खूप भ्रष्टाचार झाला होता अशी प्रतिक्रिया भाजप यूएमद्वार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केली.

आज बेळगाव मधील जिल्हा न्यायालय संकुलाला भेट देत त्यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्याला प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

न्यायालयाच्या आवारात वकील संघटनेसोबत आयोजित निवडणूक प्रचार सभेत बोलताना जगदीश शेट्टर म्हणाले की, बेळगाव बार असोसिएशन ही राज्यातील अतिशय शिस्तबद्ध संघटना आहे. एक वकील देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढला. अन्यायाविरोधात लढून न्याय मिळवून देणाऱ्या वकिलाकडे ३००० मते देण्याचे सामर्थ्य असल्याचे ते म्हणाले.

यावेळी भाजप कार्यकर्ते ऍड. एम. बी. जिरली, माजी आमदार अनिल बेनके, आर. एस. मुतालिक, मुरुगेन्द्रगौडा पाटील आदींसह भाजपचे अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: