Vijayapura

पिण्याच्या पाण्यासाठी विजापुरात आंदोलन

Share

दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या विजापूर जिल्ह्यात पुन्हा पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवला असून देवरहिप्परगी तालुक्यातील बी बी इंगळगी ग्रामस्थांनी रिकाम्या घागरी घेऊन तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन छेडले.

विजापूर जिल्ह्यातील देवरहिप्परगी तालुक्यातील बी बी इंगळगी ग्रामस्थांनी पाणी टंचाईविरोधात आज आंदोलन छेडले. देवरहिप्परगी तहसीलदार कार्यालयासमोर रिकाम्या घागरी घेऊन येथील ग्रामस्थांनी छेडलेल्या आंदोलनात तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या मांडला. या भागात पाणी टंचाईची समस्याच उद्भवली असून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली. संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनात अनेकवेळा हि समस्या मांडण्यात आली आहे. परंतु अद्याप हि समस्याच दुर्लक्षित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. १५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे, मात्र तेही पाणी दूषित असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Tags: