धारवाड लोकसभा मतदार संघातून मल्लिकार्जुन बाळनगौडा या अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरला आहे.
बारकोळ गावापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत चाबकाचे फटके रस्त्यावर मारत मल्लिकार्जुन बाळनगौडा या शेतकऱ्याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे एक उमेदवार दोनवेळा निवडणूक लढवत असेल तर अशा उमेदवाराला राष्ट्रीय पक्षाने संधी द्यावी, असे मत मल्लिकार्जुन बाळनगौडा यांनी व्यक्त केले.


Recent Comments