Dharwad

प्रल्हाद जोशी सादर करणार उमेदवारी अर्ज : शहरातील महत्त्वाच्या मंदिरांना आणि मठांना भेटी

Share

मी आज धारवाड लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्यांदा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करत आहे. माझा विरोधक काँग्रेस आहे.आजची नामांकन पदयात्रा माझ्या मागील निवडणुकीचे सर्व विक्रम मोडेल. असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले .

त्यांनी शहरातील महत्त्वाच्या मंदिरांना आणि मठांना भेटी दिल्या आणि नामांकन सादर करण्याच्या निमित्ताने विशेष पूजा केली.

मी धारवाडमधील शिवाजी सर्कलमधून मिरवणुकीतून उमेदवारी अर्ज सादर करणार आहे. सुमारे 30 हजार लोक या मिरवणुकीत सामील होतील. लोक स्वेच्छेने सामील होतील. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मठात जाण्याची माझी प्रथा आहे. आजही मठाला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले मला विश्वास आहे, लोक मला आशीर्वाद देतील, असे ते म्हणाले.

Tags: