आपल्या देशाच्या विकासात देशातील महिलांचे योगदान मोठे आहे . मोदींचे कार्यक्षम नेतृत्व हेच देशात मोठ्या बदलांचे कारण आहे. म्हणून मी उपस्थित सर्व माता भगिनींना आवाहन करतो नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वांनी परिश्रम घेतले पाहिजे असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले .
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने बेळगाव दक्षिण मतदारसंघातील भाग्यनगर रामनाथ मंगल कार्यालयात आयोजित महिला अधिवेशनाचे उद्घाटन पक्षश्रेष्ठींसह महिलांनी केले . यावेळी ते बोलत होते . महिला सक्षमीकरण हे मोदी सरकारचे मोठे स्वप्न आहे. केंद्र सरकारने या देशातील महिलांसाठी अनेक योजना केल्या आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व महिलांचा समान आदर केला गेला आहे.
देशाच्या इतिहासात प्रथमच महिला आरक्षण विधेयकही आमच्या भाजप सरकारने लागू केले. त्यामुळे आपल्या देशाच्या विकासात देशातील महिलांचे योगदान वाढेल. मोदींचे कार्यक्षम नेतृत्व हेच देशात मोठ्या बदलांचे कारण आहे. म्हणून मी उपस्थित सर्व माता भगिनींना आवाहन करतो नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वांनी परिश्रम घेतले पाहिजे
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी महिलांच्या कल्याणासाठी राबविलेल्या विविध योजनांची माहिती देताना, श्री नरेंद्र मोदीजी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवड करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याची विनंती बेळगाव लोकसभेचे भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी केली .

यावेळी बेळगाव दक्षिण मतदार संघाचे आमदार अभय पाटील म्हणाले कि , बेळगाव दक्षिण मतदार संघातून जगदीश शेट्टर याना जास्तीत जास्त मतांची आघाडी मिळवून देऊ . जगदीश शेट्टर याना विजयी करून , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करून त्यांना पुन्हा पंतप्रधान बनवू . यासाठी सर्व महिला भगिनींनी भाजपच्या पाठीशी राहावे असे आवाहन केले .
यावेळी खासदार मंगला सुरेश अंगडी, प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, जिल्हाध्यक्ष गीता सुतार, मंडळ अध्यक्ष प्रशांत कंग्राळकर, माजी विधान परिषद सदस्य .महांतेश कवटगीमठ, एम.बी.जिरली व पक्षाच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


Recent Comments