तालुक्यातील संबरगी गावात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, मात्र चोरट्याना जेरबंद करण्यात पोलीस विभागाला अद्याप अपयश आले असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे.

उषा सदाशिव जाधव यांच्या घरी ही चोरीची घटना घडली असून , काल रात्री उशिरा घराचा कडीकोयंडा तोडून 50 हजार रुपये चोरून नेण्यात आले आहेत .
गावात दोन वर्षात 10 हून अधिक चोरीच्या घटना घडल्या असून आजपर्यंत एकाही चोरट्याला पकडण्यात पोलीस विभागाला अपयश आले आहे, ही शोकांतिका आहे.


Recent Comments