Belagavi

बेळगावात देवर दासीमय्या जयंती साधेपणाने साजरी

Share

बसवादी शरणांची वचने सकारात्मक बदलाचा मार्ग आहेत. देवर दासीमय्या यांनी आपल्या वचनांद्वारे संपूर्ण मानवजातीला योग्य मार्ग दाखवला. त्यांची वचने सर्व समुदायांसाठी आदर्श आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास ताळूकर यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे कुमार गंधर्व रंग मंदिरात आज शनिवारी देवर दासीमय्या यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.  यावेळी इन न्यूजशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास ताळूकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकी आचारसंहिता लागू असल्याने देवर दासीमय्या यांची जयंती बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून साधेपणाने साजरी करण्यात आली. तरीही वडगाव, खासबाग येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

देवर दासीमय्या यांनी आपल्या वचनांच्या माध्यमातून सामाजिक क्रांती केली. वास्तव जीवनानुभव त्यांच्या वचनांत आहेत. त्यांची जयंती साजरी करून आपण सर्वांनी त्यांच्या जीवनातील अनेक पैलू अंगीकारले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी शंकर बनकार, पांडुरंग धोत्रे, कणबर्गी आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

Tags: