Belagavi

बेळगावातील नाले-गटारींची महापालिकेकडून युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम

Share

बेळगावातील प्रभाग क्र. १० मध्ये येणाऱ्या शिवाजी रोड ते अंबा भुवनपर्यंतच्या नाल्याच्या सफाईला महानगरपालिकेने प्रारंभ केला आहे.

होय, काल शुक्रवारी एकाच दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे बेळगाव शहरातील रस्ते, नाले व गटारींची दैना समोर आली आहे. नाले व गटारींत कचरा तुंबून राहिल्याने त्यातील सांडपाणी रस्त्यावर आले. त्यामुळे अनेक ठिकाणच्या रस्त्यावरून चालणेही कठीण झाले होते. या पार्श्वभूमीवर आज लगेचच दुसऱ्या दिवशी, शनिवारी बेळगाव महापालिकेने नाले-गटारींच्या स्वच्छतेची मोहीम सुरु केली आहे. त्याचप्रकारे क्र. १० मध्ये येणाऱ्या शिवाजी रोड ते अंबा भुवनपर्यंतच्या नाल्याच्या सफाईला महानगरपालिकेने प्रारंभ केला आहे. जेसीबीने नाल्यातील कचरा काढून तो महापालिकेच्या कचरावाहू वाहनात भरून नेण्यात आला.

या संदर्भात इन न्यूजशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ भातकांडे यांनी सांगितले की, शुक्रवारच्या पावसामुळे शहरातील नाले-गटारी कचऱ्याने भरून वाहून जात आहेत. याची दखल घेऊन महापालिका अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने नाले-गटारी सफाई मोहीम उघडली आहे. त्याअंतर्गत त्याचप्रकारे क्र. १० मध्ये येणाऱ्या शिवाजी रोड ते अंबा भुवनपर्यंतच्या नाल्याच्या सफाईला महानगरपालिकेने प्रारंभ केला आहे. जेसीबीने नाल्यातील कचरा काढून तो महापालिकेच्या कचरावाहू वाहनात भरून नेण्यात आला. येत्या पावसाळ्यातही हा नाला भरून वाहू लागल्यास, त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शिवाजी रोड नाल्यात प्लास्टिक, थर्मोकोल, वैद्यकीय घनकचरा, फुटलेल्या ट्यूब लाईट्स, टाकाऊ साहित्य, एरंड आणि जलपर्णी वनस्पतींची दलदल असा विविध कचरा भरला होता. जेसीबीच्या मदतीने तो क्चरवाहन वाहनात भरून नेण्यात आला.याबाबत नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी पाठपुरावा केले महापालिकेने पावसाने नाला तुंबल्याची त्वरित दखल घेऊन तो हटविण्याची मोहीम सुरु केल्याने प्रभाग क्र. १० मधील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

Tags: