Vijayapura

विजयपूरमध्ये तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

Share

जुन्या वादातून विजयपूर शहरातील जामिया मशिदीजवळ एका तरुणाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

शहरातील पेटी बावडी भागातील रहिवासी राजीन जमादार, वय २७ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमागे जुना वाद असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना गोलघुमट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Tags: