चिक्कोडी तालुक्यातील करोशी गावाच्या हद्दीतील स्वामी विवेकानंद ऍग्रो इंडस्ट्रीजला शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांची मशिनरी जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले.

श्रुती अण्णाप्पा हाळीजोळ यांच्या गोदामात शेतकऱ्यांसाठी लागणारे पॉली हाऊस साहित्य तयार करण्यात येते. या गोदामाला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने लाखो रुपयांची मशिनरी व साहित्य जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चिक्कोडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.


Recent Comments