बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर येत्या 17 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
जगदीश शेट्टर यांच्या हस्ते सदाशिव नगर, बेळगाव येथील तात्यांच्या प्रसारमाध्यम कार्यालयाचे उद्घाटन आज शुक्रवारी करण्यात आले.
यावेळी प्रभाकर कोरे, महांतेश कवटगीमठ, बेळगावच्या महापौर सविता कांबळे, खासदार मंगला अंगडी, माजी आमदार तथा प्रदेश भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, भाजप महानगर जिल्हाध्यक्षा गीता सुतार आदी उपस्थित होते. फ्लो
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जगदीश शेट्टर यांनी सांगितले की, आपण आपला उमेदवारी अर्ज 17 एप्रिल रोजी भरणार आहेत.

त्यांच्यासोबत शेजारील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार आहेत. दररोज सकाळी ‘चाय पे चर्चा’ आयोजित करण्यात येत आहे. बेळगाव लोकसभेच्या सर्वत्र मेळावे, प्रचारसभा घेण्यात येत आहेत. त्यांना लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपचे कार्यकर्ते बूथ स्तरावर चांगले काम करत आहेत. असे ते म्हणाले


Recent Comments