धारवाड येथील ढाब्यावर जेवण करून परतत असताना मागून येणाऱ्या बुलेट दुचाकीची ट्रॅक्टरला धडक बसून झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना धारवाड तालुक्यातील मुम्मीगट्टीजवळ राष्ट्रीय महामार्गावर घडली.
ओंकार संगनवर, वय 18 असे मृत तरुणाचे नाव असून तो शेट्टर कॉलनी, धारवाड येथे राहणारा आहे. तर ऋत्विज सज्जनवर नावाचा आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ओंकार व ऋत्विज सर्व मित्र जेवायला बाहेर गेले होते. जेवण करून परतत असताना हा अपघात झाला. गरग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा नोंदवला.


Recent Comments