बेळगावातील केएलई संस्थेच्या लिंगराज पदवीपूर्व कॉलेजची कॉमर्स विभागाची विद्यार्थिनी तनिष्का सुधीर पाटील हिने पीयूसी द्वितीय वर्ष परीक्षेत 600 पैकी 588 गुण मिळवून राज्यात 10 वा क्रमांक पटकावला आहे.
बेळगावच्या विद्यार्थिनी तनिष्का सुधीर पाटील हिने पीयूसी द्वितीय वर्ष परीक्षेत 600 पैकी 588 गुण मिळवून राज्यात 10 वा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशाबद्दल प्राचार्य व सर्व प्राध्यापकांनी आनंद व्यक्त केला. तिच्या पालकांनी मुलीला मिठाई खाऊ घालून आनंदोत्सव साजरा केला.
लिंगराज कॉलेजच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिकवलेल्या धड्यांचा सराव करत कठोर परिश्रमाने उच्च गुण मिळवले. वर्गात दिलेला धडा मी वाचून त्यावर मनन करायचे. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका, पूर्व तयारी परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत असे. कठोर मेहनतीमुळेच मला हे यश मिळाल्याची माहिती तनिष्काने दिली.


Recent Comments