Vijayapura

अनैतिक संबंधातून महिलेचा खून

Share

विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील कांबगी गावात अनैतिक संबंधाच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे .

साबू गाळवे याने त्याच्या पत्नीचा खून केला आहे . भांडण सोडवण्यासाठी आलेल्या यल्लव्वा गाळवे या त्याच्या सासूला देखील त्याने मारहाण केली आहे . सासूला जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत. ही घटना बबलेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Tags: