Belagavi

समर्थनगरमध्ये पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ

Share

समर्थनगर, बेळगाव येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक सामुदायिक पारायण सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची मुहूर्तमेढ आज रोवण्यात आली.

नुतन वर्षाच्या मुहुर्तावर या पारायण सोहळ्याचे मंडप खांब पुजन सौ व श्री निर्मल शंकर कणेरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी वारकरी संप्रदायाचे विठ्ठल रुक्मीनी भजनी मंडळ भाजीमार्केट यांच्यातर्फे महाआरती करण्यात आली. यावेळी नागेश गावडे यांनी सौ व श्री निर्मल शंकर कणेरी यांचा शाल व श्री फळ देऊन सत्कार केला.


यावेळी मलिकार्जुन नगर तसेच समर्थ नगर मधील नागरिक व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अरुण गावडे यांनी केले तर आभार अशोक जनकाठी यांनी मानले.

Tags: