Belagavi

बेळगावात ‘रंगसृष्टी’तर्फे जागतिक रंगभूमी दिन

Share

रंगभूमी शाश्वत आणि सत्य असल्याचे मत नागनूर रुद्राक्षी मठाचे श्री अल्लमप्रभू स्वामीजी यांनी व्यक्त केले.  बेळगाव येथील कन्नड भवनात रंगसृष्टीतर्फे आयोजित जागतिक रंगभूमी दिनाच्या कार्यक्रमात अल्लमप्रभू स्वामीजी बोलत होते. जगाने विज्ञानात खूप प्रगती केली आहे. आपण सर्व काही अनुभवत आहोत. या सर्वांशिवाय कसे जगायचे हे शिकले पाहिजे, असा दिवस येऊ शकतो, असा इशारा स्वामीजींनी दिला.

‘रंगसृष्टी’ संस्थेचे अध्यक्ष रमेश जंगल आणि उपाध्यक्ष एम. के. हेगडे यांनी झाकीर नदाफ यांना रंगसृष्टी पुरस्कार प्रदान केला. ज्येष्ठ साहित्यिक रामकृष्ण मराठे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पी. जी. केम्पण्णावर यांनी मानपत्राचे वाचन केले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सरजू काटकर व अन्य उपस्थित होते.

Tags: