निपाणीजवळील गव्हाणे मोरारजी देसाई निवासी शाळेत दहावीच्या विद्यार्थ्याचा शाळेच्या बाथरूममध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

पारस सुधाकर तोडकर (वय १६) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.मृत पारस हा चिक्कोडी तालुक्यातील कुठळी गावचा रहिवासी असून तो मोरारजी निवासी शाळेत दहावीत शिकत होता. दहावीची अंतिम परीक्षा संपल्यानंतर तो शाळेच्या बाथरूममध्ये तोंड धुत असताना कोसळला.
दरम्यान, त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. असे मृत पारसचे वडील सुधाकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


Recent Comments