Belagavi

‘आदित्य मिल्क’चे शिवकांत सिदनाळ यांचे निधन

Share

‘आदित्य मिल्क’ या प्रसिद्ध ब्रॅण्डची निर्माती असलेल्या विजयकांत डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक शिवकांत सिदनाळ यांचे आज, शनिवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 59 वर्षांचे होते.

शिवकांत सिदनाळ हे बेळगावचे माजी खासदार एस. बी. सिदनाळ यांचे सुपुत्र होत. वडिलांप्रमाणे राजकारणात न येता, त्यांनी उद्योगाची वेगळी वाट चोखाळत विजयकांत डेअरी प्रा. लि.ची स्थापना केली. दर्जा व गुणवत्तेशी तडजोड न करता, त्यांनी डेअरी उद्योगात धाडसाने नवनवे प्रयोग करून हा व्यवसाय अल्पावधीतच नावारूपास आणला.

त्यांच्या ‘आदित्य मिल्क’ या दुधाच्या ब्रॅण्डने कर्नाटक, महाराष्ट्रासह गोवा व अन्य राज्यात चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. बेळगाव मॅरेथॉनसारखे विविध सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले व पुरस्कृत केले आहेत.

Tags: