भाजपच्या गॅरंटीला झीरो व्हॅल्यू आहे. मात्र, काँग्रेसने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सर्व गॅरंटी पूर्ण केल्या आहेत. त्याचा लाभ प्रत्येक कुटुंबाला मिळत आहे, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
बेळगाव येथील काँग्रेस कार्यालयात शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, काँग्रेस पक्षासाठी यावेळी चांगले वातावरण आहे. सर्व समाजाने पाठिंबा व्यक्त केला आहे. चिक्कोडीतील विद्यमान खासदाराने जनतेचा विश्वास गमावला असून अण्णासाहेब जोल्ले यांच्याकडून कोणताही विकास झाला नसल्याचे लोक सांगतात.
भाजपच्या गॅरंटीला किंमत नाही. मात्र, काँग्रेसने आश्वासनाप्रमाणे सर्व हमी पूर्ण केल्या आहेत. त्याचा लाभ प्रत्येक कुटुंबाला मिळत आहे. ते म्हणाले की, आमच्या गॅरंटी आणि सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा योग्य कारभार काँग्रेसला विजयपथावर नेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपने आयकर विभागाच्या, सीबीआय अधिकाऱ्यांचा गैरवापर करून घेत काही नेत्यांना आपल्या पक्षात आणल्याची टीका करून ते म्हणाले की, भाजपचे नेते काही लोकांना पैसे न दिल्यास तुम्हाला संपवून टाकू अशा धमकी देऊन आपल्या पक्षात भरती करत आहेत, भाजप गेल्या 10 वर्षांपासून हेच करत आला आहे, असा आरोप त्यांनी केला.
गेल्या पाच वर्षांपासून चर्चेत असलेल्या पुलवामा हल्ल्याचा भाजप राजकीय फायद्यासाठी वापर करत आहे का या प्रश्नाचे उत्तर जनतेने द्यावे, असे ते म्हणाले. भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. भाजपमध्ये प्रचंड नाराजी आहे. तो आमच्यासाठी प्लस पॉइंट असेल. तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षातील प्रभावशाली नेत्यांच्या मागे ससेमिरा लावून सत्तेचा गैरवापर करण्याची रणनीती केंद्र सरकार अवलंबत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
चिक्कोडीत मोदी लाट मुळीच नाही. प्रियांका आणि अण्णासाहेब जोल्ले यांच्यात थेट स्पर्धा होणार आहे, असे ते म्हणाले. बाइट
विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी, आमचे दोन मंत्री बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात चांगला प्रचार करत असून दोन्ही मतदारसंघात आम्ही विजयी होऊ, असा विश्वास व्यक्त केला. हमी योजना अमलबजावणी समितीचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments