Belagavi

हुंड्यासाठी छळ करून घराबाहेर काढल्याचा महिलेचा आरोप

Share

माझ्या पतीची चूक लपवण्यासाठी सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी माझा छळ करून मला घराबाहेर हाकलून दिले. आम्ही पोलिसांकडे न्याय मागण्यासाठी गेलो असतानाही आम्हाला न्याय दिला जात नाही, असा आरोप प्रियांका दर्शन हळकी यांनी केला आहे.

बेळगावात शनिवारी पत्रकारांशी बोलताना प्रियांका यांनी सांगितले की, माझा पती दर्शन हळकी, बेंगळुरू येथे एका खासगी कंपनीत काम करत होता. त्याच्याशी तीन वर्षांपूर्वी माझे लग्न झाले आहे. पण सासू, सासरे व त्यांची बहीण या सगळ्यांनी माझ्या नवऱ्याच्या घरात माझा छळ केला.

वैद्यकीय तपासणी दरम्यान, माझ्या पतीला समस्या असल्याचे आढळले. मात्र त्यांनी माझ्यावर विनाकारण आरोप करून मला मारहाण केली आणि घराबाहेर काढले, अशी तक्रार त्यांनी केली आहे. याबाबत पोलिसदेखील आपल्याला न्याय मिळवून देत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: