कर्नाटकातील जनतेने सिद्धरामय्या यांना सत्तेवर आणले आहे. सत्तेत आणलेली जनता आता अडचणीत आली आहे. त्यांच्या मदतीला धावून जाणे हे त्यांचे काम आहे. पूर आला की आम्ही कोणाचीही वाट न पाहता दोनदा नुकसानभरपाई देऊ केली आणि आमच्यातील धमक दाखवली. दुष्काळ निवारण करून आपली धमक सिद्दरामय्या यांनी दाखवावी, असे आव्हान माजी मुख्यमंत्री बसवराजा बोम्मई यांनी दिले आहे.
हानगल तालुक्यातील अडूर गावात प्रचारादरम्यान बोलताना बोम्मई म्हणाले, “आम्ही 17 लाख लोकांना दिलासा दिला आहे. नुकसान भरपाई देताना आम्ही कोणाकडेही बोट करून दाखवले नाही. ती खरी धमक आहे. शेतकऱ्यांना आधी नुकसान भरपाई द्या, नंतर केंद्राकडून नुकसान भरपाई मिळेलच. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी यांची तिजोरी रिकामी आहे. आपले अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट करत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.
आम्ही रामाचे नामस्मरण करतो. आम्ही रामराज्य करू. नरेंद्र मोदींनी दिलेला तांदूळ कर्नाटकात येत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तांदळाचा दाणाही दिला नाही. त्यांना तांदळावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोला त्यांनी लगावला. एसडीपीआय हे काँग्रेसचेच अपत्य आहे. काँग्रेसच्या राजकारणातून जन्मलेले मूल. त्यासाठी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे ते म्हणाले.


Recent Comments