चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या नावाने सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवत आहेत.

ही पोस्ट काही फेसबुक पेज आणि व्हॉट्सॲपवरून व्हायरल होत आहे. त्यात अण्णासाहेब जोल्ले याना दलित आणि मुस्लिम मते नकोत अशी फोटोशॉप केलेली पोस्ट व्हायरल झाली. जोल्ले यांच्या कार्यालयाने या पोस्टबाबत सोशल मीडियावर जाहीर निवेदन जारी केले. त्यानंतर लगेचच केंद्रीय निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे तक्रार नोंदवण्यात आली.
निवडणुकीच्या तोंडावर समाजकंटकांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावण्यासाठी हा गुन्हा केला असल्याची तक्रार अण्णासाहेब जोल्ले यांनी दिली आहे.


Recent Comments