हरितक्रांतीचे प्रणेते व माजी उपपंतप्रधान डॉ. बाबू जगजीवनराम यांची 117 वी जयंती बेळगावात आज जिल्हा प्रशासनातर्फे साजरी करण्यात आली. यानिमित्त त्यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
हरितक्रांतीचे प्रणेते व माजी उपपंतप्रधान डॉ. बाबू जगजीवनराम यांच्या 117 व्या जयंतीनिमित्त बेळगावात जिल्हा प्रशासनाच्यावतीने डॉ. बाबू जगजीवनराम यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मिरवणुकीला जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते चालना देण्यात आली.

पारंपरिक वाद्यांच्या गजरात सजवलेल्या रथात डॉ. बाबू जगजीवनराम यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयापासून काढलेली ही मिरवणूक चन्नम्मा चौक, डॉ. आंबेडकर रोड, कोल्हापूर सर्कल आदी मार्गांवरून संचार करून नेहरूनगरातील डॉ. बाबू जगजीवनराम उद्यानाजवळ समाप्त झाली.
यावेळी बेळगाव शहर पोलीस आयुक्त यडा मार्टिन मारबान्यांग, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, समाज कल्याण विभागाचे सहसंचालक नवीन शिंत्रे, कन्नड व संस्कृती खात्याच्या उपसंचालिका विध्यावती बजंत्री, दलित संघटनेचे नेते मल्लेश चौगुले, बाबू पुजारी, मल्लेश कुरंगी, यल्लाप्पा हुदली आदी उपस्थित होते.


Recent Comments