Banglore

मंड्याच्या खासदार सुमलता अंबरीश यांनी केला महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर : भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची केली घोषणा

Share

मंड्याच्या खासदार सुमलता अंबरीश यांनी स्पष्ट केले की ते भाजप-जेडीएस युतीला पाठिंबा देतील. बुधवारी मंड्या येथे समर्थकांच्या बैठकीत बोलताना त्या म्हणाल्या कि , खासदार आणि आमदारांना तिकीट न मिळाल्यास अनेकजण पक्ष सोडतील. मी खासदारकी सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. मोदींच्या कामगिरीचे कौतुक करून त्या भाजपमध्ये येणार असल्याचे त्यांनी सांगितले

सुमलता अंबरीश मंड्याची माती कधीही सोडणार नाही. मंड्याचे ऋण, मंड्यातील जनतेला कधीच सोडणार नाही. हे प्रेम असेच वृद्धिंगत होवो. येणाऱ्या काळात माझ्या सर्व प्रयत्नात माझ्यासोबत राहा. तुम्ही मला खासदार म्हणून ओळखले नाही. अंबरीशची पत्नी म्हणून, मंड्याची सून म्हणून ओळखल . तुम्ही मला आईचे स्थान दिले आहे , मुलांना त्यांच्या आईपासून वेगळे करता येत नाही. असे त्या म्हणाल्या .

माझ्या कार्यकर्त्यांना आणि चाहत्यांना सक्षम करण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. पक्षनिरपेक्ष स्पर्धेची गरज नाही, काँग्रेसला माझी गरज नाही. त्या पक्षविरहित खासदार असूनही भाजपने 4 हजार कोटी अनुदान दिले. त्यानी मला प्रत्येक गोष्टीत विश्वासात घेतले. मला तुमच्या नेतृत्वाची गरज असल्याचे खुद्द पंतप्रधानांनी सांगितले. नेतृत्व विकसित करण्याची क्षमता भाजपमध्ये आहे. मोदींनी संपूर्ण जगाला भारताकडे बघायला लावले आहे. विकास हा मोदींचा मंत्र आहे. त्यांच्यावर
एकही डाग नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली मी पुढे जाईन. मी ही निवडणूक लढवत नाही. मात्र मंड्या सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Tags: