Dharwad

श्री कलमेश्वर रथोत्सवादरम्यान इंगळ्यातुन धावले भक्त

Share

होळी सणाबद्दल आपण ऐकले आहे. मात्र धारवाड जिल्ह्यातील कलघटगी तालुक्यातील बिरवल्ली येथे इंगळयांमधून धावून तसेच इंगळ्या भक्तांवर उडवून देवाची भक्ती करण्याची परंपरा घडली आहे.

दरवर्षी भरणाऱ्या कलघटगी तालुक्यातील बिरवल्ली गावातील श्रीकलमेश्वर मंदिराच्या रथोत्सवादरम्यान भाविकांनी एकमेकांवर इंगळ्या शिंपडून विचित्र पद्धतीने आपली भक्ती अर्पण केली आहे. आज पहाटे चार वाजता सुरू होणारा रथोत्सव हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमणार आहे.

कलमेश्वर देवाच्या जत्रा महोत्सवाचा एक भाग म्हणून या जत्रा महोत्सवासाठी तावरगेरी, यळवडाळ, बिरवल्ली गावातील भाविक सहभागी झाले होते. ते पाच वेळा पालखी घेऊन इंगळयात प्रवेश करतात. मंदिरासमोर प्रसिद्ध असा हा इंगळयांचा कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांची गर्दी जमली होती . जमलेले तरुण, लहान मुले, महिला, वृद्ध लोक दोन्ही हातात चमेलीच्या फुलासारखे निखारे घेऊन ते भिरकावत होते .

इंगळयांसाठी लाकूड आणून त्याचे तुकडे करून मंदिरासमोर ते जाळून त्यापासून इंगळ्या तयार केल्या जातात . ह्या इंगळ्या इतक्या रसरशीत फुललेल्या असतात कि पाहणाऱ्याला देखील भीती वाटते . मात्र आजूबाजूच्या गावातील पालखी या धगधगत्या इंगळयांवरून नेली जाते .

येथील भाविकांचा समूह सकाळी मंदिरासमोरील इंगळ्यात सहभागी होतात . . पहाटेच्या वेळी हा कार्यक्रम पाहण्यासाठी आबालवृद्ध मोठ्या संख्येने हजर असतात . यंदाही तिथल्या तरुणांनी समस्त गावकऱ्यांसोबत मिळून हा कार्यक्रम सुरू ठेवला आहे.

Tags: