Dharwad

धारवाडमध्ये दोन लॉरींची समोरासमोर धडकेत दोन्ही चालकांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

Share

काल रात्री धारवाडच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर दोन लॉरींची समोरासमोर धडक होऊन दोन ट्रक चालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या अपघातात अमित नामक ट्रक चालकच्या मृत्यू झाला असून तो बेळगावचा रहिवासी असल्याचे समजते . तर गंभीर जखमी झालेल्या अन्य चालकाला वाचवून हुबळी येथील किम रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्याचे नाव समजू शकले नाही .

या घटनेत दोन ट्रकमधील तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना हुबळी किम्स रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघाताची माहिती स्थानिक वाहनधारकांनी धारवाड वाहतूक व ग्रामीण पोलीस ठाण्याला दिल्याने पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृत चालकाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी धारवाड जिल्हा रुग्णालयात पाठविला.

मयत अमित हा निप्पाणीहून त्यांची तंबाखूने भरलेली लॉरी बेंगळुरूच्या दिशेने घेऊन जात होता तर दुसरी लॉरी हुबळीहून बेळगावच्या दिशेने राष्ट्रीय महामार्गावर जात होती.याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसऱ्या मयत चालकाचे नाव तसेच जखमींची नावे पोलीस तपासनंतरच समजतील .

Tags: