Belagavi

जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांनी बाची चेकपोस्टला भेट देऊन केली पाहणी

Share

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत स्थापन करण्यात आलेल्या विविध चेकपोस्टला जिल्हाधिकारी नितेश पाटील व पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बीनांग यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघांतर्गत बाची चेकपोस्ट येथे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी स्वतः काही वाहनांची तपासणी केली.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी काही चेकपोस्ट आंतरराज्य सीमेला लागून असल्याने कडक दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या.


बेळगावची सीमा गोवा आणि महाराष्ट्र राज्यांना लागून असल्याने अवैध दारूची तस्करी होण्याची शक्यता जास्त आहे. याशिवाय आदर्श आचारसंहिता लागू असल्याने पैसे व वस्तूंच्या अवैध वाहतुकीवरही लक्ष ठेवले पाहिजे.
पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बीनांग यांनी पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिले की पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रत्येक चेक पोस्टवर उपस्थित राहून तपासणी करावी.

चेक पोस्टवर तैनात असलेल्या टीमच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी त्यांचे ओळखपत्र अनिवार्यपणे परिधान करणे आवश्यक आहे; प्रत्येक वाहन तपासणी रजिस्टरमध्ये प्रविष्ट करणे आवश्यक आहे; वाहनाची तपासणी करताना सौजन्याने वागण्याबरोबरच स्वत:च्या सुरक्षेचीही काळजी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.
*

Tags: