Belagavi

बसवण कुडची येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वर, बसवण्णा व ब्रह्मलिंग जत्रा प्रारंभ

Share

सालाबादप्रमाणे या वर्षी ही बसवण कुडची येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वर, बसवण्णा व ब्रह्मलिंग मंदिराची जत्रा शनिवार दि 30 मार्चंपासून पासून सुरु झाली आहे. शनिवारी पहाटे 4वाजता गावातील सुमारे 8 हजाराहून अधिक लोकांनी जाऊन काकती येथील डोंगरातून इंगळ्यांची लाकडे आणली . .

सोमवारी दिनांक 1 रोजी सकाळी रुद्राभिषेक घालण्याचा कार्यक्रम झाला.सायंकाळी पाच वाजता आंबील गाड्यांची मंदिराला प्रदक्षिणा घालून गुलालाची उधळण करत आंबील व घुगऱ्या वाटप झाले . त्यानंतर गाडे पळवण्यात आले . मंगळवार दिनांक 2 रोजी सकाळी धार्मिक पूजा, सायंकाळी पाच वाजता इंगळ्यांचा कार्यक्रम, रात्री विविध मनोरंजनाचे कार्यक्रम व भजनाचा कार्यक्रम पार पडला . बुधवार दिनांक 3 व गुरुवारी खळ्यांच्या कुस्त्यांचे आयोजन केले आहे.


मंगळवार दिनांक 9 रोजी गुढीपाडव्यानिमित्त मंदिरात अभिषेक घालण्याचा कार्यक्रम होईल. सायंकाळी पाच वाजता पंचांगपठण व सायंकाळी पाच वाजता बाल शिवाजी लाठीमेळा यांच्यातर्फे प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. रात्री विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. असे यात्रा कमिटीने कळविले आहे.

Tags: