85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदान करण्याची परवानगी देण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते राघवेंद्र पुजार यांनी बेळगावच्या निवडणूक अधिकाऱ्यांना केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदान करण्याची परवानगी दिली आहे. 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना गुडघेदुखी, दृष्टीदोष, मधुमेह, रक्तदाब आणि अशक्तपणा अशा अनेक आजारांनी ग्रासलेले असते. त्यामुळे तासनतास रांगेत उभे राहून मतदान करणे आणि घरी परतणे त्यांना खूप अवघड जाते.
यासाठी बेळगाव लोकसभेच्या निवडणुकीसाठी घरबसल्या मतदान करण्याची परवानगी देण्यासाठी पावले उचलावीत, अशी विनंती पुजार यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


Recent Comments