Belagavi

बेळगावात केंद्र-राज्य सरकारच्या विरोधात रयत संघाचे जोरदार आंदोलन

Share

भीषण दुष्काळात होरपळणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना भरपाई देण्यास केंद्र व राज्य सरकार दिरंगाई करत असल्याच्या निषेधार्थ कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे बेळगावात आज जोरदार आंदोलन छेडण्यात आले.

कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हसिरु सेनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मंगळवारी बेळगावातील चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळी करून निदर्शने करून भीषण दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्यास मागेपुढे पाहणाऱ्या केंद्र व राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाचा निषेध केला. यावेळी बोलताना शेतकरी नेते चुनाप्पा पुजारी म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत तातडीने द्यावी. केंद्राकडून दुष्काळी मदत एकरी 50 हजार रुपये व राज्य सरकारने 30 हजार रुपये जाहीर करावेत,अशी मागणी त्यांनी केली.

एक स्वामीजी बोलताना म्हणाले की, दुष्काळामुळे आमचे शेतकरी खूप अडचणीत आले आहेत. त्याचप्रमाणे आम्ही गोशाळा चालवत होतो, आम्हाला सरकारकडून अनुदान मिळत होते, पण काँग्रेसचे सरकार आल्यावर अनुदान बंद झाले, आम्ही नुकसानीत गोशाळा चालवत असून, शेतकरी आत्महत्या का करतात हे सरकारने समजून घेतले पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला सरकारने उत्तर द्यावे.

राज्य रयत संघांचे सरचिटणीस निपाणीचे राजेश पोवार म्हणाले की, मान्सूनचा पाऊस न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. ४-५ महिन्यांपूर्वी दुष्काळ जाहीर करूनही राज्य सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुढे येत नाही. हे शेतकरी विरोधी सरकार आहे. सरकारने आपले शेतकरी विरोधी धोरण सोडून देऊन त्यांच्या मदतीसाठी पुढे यावे अशी मागणी त्यांनी केली. बाइट
त्यानंतर शेतकरी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखले. त्यामुळे काही काळ पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये वादावादी झाली. त्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी न्यायालयासमोरील रस्ता रोखून निदर्शने केली.

यावेळी शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स आडवे करून आपला संताप व्यक्त केला, अचानक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी डीसीपी रोहन जगदीश यांनी शेतकऱ्यांना ढकलून देत रोखले. त्यामुळे शेतकऱ्यांनी वाहने अडवून संताप व्यक्त केला.  शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करून आंदोलन करत असतानाच जिल्हाधिकारी नितेश पाटील आले व त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

यावेळी एका शेतकरी नेत्याने, शेतकऱ्यांना आत जाऊ देऊ नये असा आदेश कोण दिला? असा सवाल करून शेतकऱ्यांच्या दुरवस्थेची काहीही माहिती नसल्याचा संताप व्यक्त केला. दुष्काळी मदत न देता शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती चुकीची असल्याची तक्रार आंदोलकांनी केली.

 

Tags: