Chikkodi

चिक्कोडीत 12 एप्रिल रोजी मोफत शस्त्रक्रिया शिबीर : डॉ.दयानंद नूली

Share

चिक्कोडी तालुका व परिसरातील गोरगरीब जनतेसाठी ऑल इंडिया सर्जन असोसिएशन, कर्नाटक सर्जन असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन चिक्कोडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने 12 एप्रिल रोजी मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टर दयानंद नूली यांनी दिली.

चिक्कोडीत पत्रकार परिषदेत बोलताना डॉक्टर दयानंद नूली म्हणाले की, या शिबिरात शरीरावरील गाठी, थायरॉईड, पित्ताशयातील खडे, हर्निया, अपेंडिक्स, मूळव्याध, फिशर, फिस्टुला यासारख्या सामान्य शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. या शस्त्रक्रिया सत्य साई हॉस्पिटल, शिवकृपा हॉस्पिटल, भाटे हॉस्पिटल, कमल हॉस्पिटल येथे सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत करण्यात येणार आहेत. या शस्त्रक्रिया दिल्ली, अलाहाबाद, बेंगळूर, म्हैसूर, हुबळी, मदुराई, चेन्नई या शहरांतील कुशल आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून केल्या जाणार आहेत.

सुमारे 40 ते 50 मोफत शस्त्रक्रिया या शिबिरात केल्या जाणार आहेत. सकाळी भारतीय वैद्यक सभेत चरमूर्ती मठाचे शून्य संपादन स्वामीजी यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन होणार आहे. अखिल भारतीय शल्य चिकित्सक संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रबाला नियोगी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अशोक गोधी येणार आहेत. याशिवाय डॉक्टर नारायण हेबसुर, डॉक्टर चंद्रशेखर, डॉक्टर मारुत पांड्यान उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत डॉक्टर मारुती मुसळे, डॉक्टर रोहिणी कुलकर्णी, डॉक्टर रवी भाटे, डॉक्टर दर्शन पुजारी, डॉक्टर राजेंद्र दीक्षित, डॉक्टर अंकिता मुसळे आदी उपस्थित होते.

Tags: