Belagavi

मॅडम, तुम्ही तर कुठे स्थानिक आहात?, धनंजय जाधव यांची टीका

Share

जगदीश शेट्टर यांच्यावर टीका करताना तुमचा स्थानिक पत्ता सांगा? म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मंत्री श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तुम्ही पण बाहेरचेच आहात अशी आठवण करून देत टीका केली आहे.

काँग्रेसच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्यावर टीका करताना तुमचा स्थानिक पत्ता सांगा? भाजपमध्ये पक्षासाठी कार्य केलेला कार्यकर्ता मिळाला नाही काय? मंगला अंगडींच्या घरामध्येच सर्व पाहिजेत काय? अशा प्रकारची टीका केली आहे.

त्याला प्रत्युत्तर देताना भाजप बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी, तुम्ही तर कुठे स्थानिक आहात? कॅनरा लोकसभा क्षेत्रामध्ये तुमचं गाव आहे, तुम्ही पण बाहेरचे आहात. कांग्रेसमध्ये चांगले कार्यकर्ते असताना सगळी पद तुमच्या घरातच पाहिजे आहेत का? असा प्रश्न उपस्थित करून त्यांच्यावर टीका केली आहे.

Tags: