विनायक मार्ग समर्थ नगर बेळगाव येथील श्री एकदंत युवक मंडळ यांच्यावतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास मोठ्या संख्येने पाळून आपल्या धर्मासाठी बलिदान दिलेले शंभुराजांना आदरांजली वाहण्यात आली.
समर्थ नगर येथील श्री एकदंत युवक मंडळाने सतत 14 वर्षे पासुन मोठ्या भक्तिभावाने बलिदान मास पाळत आहेत. यावेळी समर्थनगरमधील मुले-मुली,युवा कार्यकर्ते, तसेच जेष्ठ नागरिक या बलिदान मास च्या पुजेला रात्री ९:०० वाजता ध्येय मंत्र, प्रेरणा मत्रांनी पुजा करण्यासाठी उपस्थित असतात. तसेच आपल्याला आवडत्या वस्तू वर्ज्य करून
आपल्या परीने आपल्या शंभुराजांना आदरांजली वाहण्याचे काम या परिसरातील नागरिक करत आहेत. तसेच आपल्या राजाने बलिदान कशासाठी दिले आहेत आणि का दिले आहेत यांचे महत्व पटवुन देण्यासाठी रोज व्याखाने भरविण्यात येतात. मच्छे गावातील साक्षी पाटील यांनी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज तसेच लव्ह जिहाद बद्धल व्याख्यान दिले. धर्म ठिकवायचा असेल तर छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा इतिहास जाणुन घेतला पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी गिरीश कणेरी, अजित जाधव, नागेश गावडे, सुधाकर ताशीलदार,संतोष कणेरी,अरुण गावडे, सिद्धार्थ पालठेकर, प्रिया, प्रगती महिला मंडळाच्या सदस्या, नागरिक, युवा कार्यकर्ते, बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments