धारवाड तालुक्यातील हारोबेळवडी गावातील शेतकरी संगाप्पा कडले यांच्या दोन गवतगंजींना अचानक आग लागून हजारो रुपये किमतीचा चारा जळून खाक झाला.
कडले यांच्या दोन गवतगंजींना अचानक आग लागली. याची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्यात येत नसल्याने तत्काळ अग्निशमन दलाला कळवण्यात आले. अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन आग विझवली. मात्र, तोवर शेतकरी संगाप्पा यांच्या मालकीचा चारा जळून खाक झाला असून, त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.


Recent Comments