Chikkodi

बेकायदेशीर रित्या साठवलेला 15876 रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त

Share

निप्पाणी मतदारसंघांतर्गत येणाऱ्या गळतगा गावातील केईबी नवग्राम येथील घरात बेकायदेशीररीत्या 15876 रुपये किमतीचा मद्यसाठा करण्यात आला होता. उत्पादन शुल्क विभागाकडून हा छापा टाकून, अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे .

उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यात , बेकायदेशीररित्या साठा करण्यात आलेली २५.९७ लिटर महाराष्ट्र राज्य देशी दारू , १२.४२ लिटर बीएचटी (डीके आणि बंगलोर व्हिस्की) आणि ७.८० लिटर बिअर जप्त करण्यात आली.

Tags: