Belagavi

भाजप भांडवलदारांचा पक्ष, गरिबांसाठी दरवाजे केले बंद : सतीश जारकीहोळी

Share

काँग्रेस पक्ष युवक, मध्यमवर्ग आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे, मात्र भाजप विकासकामे न करता खोट्या प्रचारापुरता मर्यादित आहे. अशा भाजपला कंटाळून शेकडो कार्यकर्ते आज काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत ही समाधानाची बाब आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील बसापुर, हागेदाळ, शिरूर आणि पाश्चापूर आदी गावातील शेकडो तरुणांनी संजय सिद्धगौडा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर ते बोलत होते.  मंत्री जारकीहोळी पुढे म्हणाले की, भाजप निर्लज्जपणे जनतेशी खोटे बोलत आहे. आम्ही सत्य सांगण्यास कचरतो. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेला सत्य सांगावे आणि जनतेचा विश्वास संपादन करावा.

भाजप गरीब लोकांच्या समस्यांना प्रतिसाद देत नाही आणि निर्लज्जपणे खोटे बोलून त्यांना वेठीस धरतो. आम्ही गरिबांसाठी काम करत असलो तरी सत्य सांगायला कचरतो. काँग्रेस आणि भाजपमध्ये हाच फरक आहे. कार्यकर्त्यांनी घराबाहेर पडून आपण केलेल्या चांगल्या गोष्टींची सत्यता सांगून लोकांची मने जिंकली पाहिजेत. पक्षाला पुन्हा सत्तेत आणले पाहिजे, असे ते म्हणाले.

गरीब, पिडीत, शेतकरी, महिला आणि जनतेला भाजपचा फायदा नाही. राज्यात आणि देशात भाजपची सत्ता आल्यानंतर गरिबांसाठी सर्व दरवाजे बंद झाले आहेत. भाजप नेहमीच श्रीमंतांसाठी, भांडवलदारांसाठी, उच्चवर्गीयांसाठी काम करतो. तो भांडवलदारांचा पक्ष असल्याची टीका त्यांनी केली.

Tags: