बेळगावातील आदर्श नगर वडगाव येथील संजीवींनी फौंडेशनमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी रंगपंचमी उत्साहात साजरी केली.
बेळगावात वडगाव, शहापूर, खासबाग व अन्य काही ठिकाणी परंपरेनुसार होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्यात येते.
त्यानुसार आज या भागात रंगपंचमी साजरी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आदर्श नगर वडगाव येथील संजीवींनी फौंडेशनने ज्येष्ठ नागरिकांनाही रंगांचा हा खेळ साजरा करून काहीक्षण विरंगुळा मिळावा यासाठी रंगपंचमी साजरी करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांनीही हिरीरीने सहभागी होता रंगपंचमी उत्साहात साजरी केली. काळजी केंद्रात राहणारे आबालवृद्ध तसेच कर्मचाऱ्यांनी एकमेकांना रंग लावून गाण्यांच्या ठेक्यावर नृत्य करत रंगपंचमी साजरी केली. विशेष म्हणजे होळीची पारंपरिक ओळख असलेला शंखध्वनीही करण्यात आला.

त्यांच्या सोबत संस्थेच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनीही रंगपंचमीचा आनंद लुटला. सविता देगीनाळ यांनी प्रत्येक आजी-आजोबा तसेच इतरांनाही रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.


Recent Comments