बेळगाव शहराची महानगराकडे वाटचाल होत असतानाच येथील लोकांच्या विविध गोष्टींविषयी अभिरुची वाढत आहे. गेल्या काही वर्षांत शहरातील ज्वेलरी प्रेमींची संख्याही वाढती आहे. या पार्श्वभूमीवर ज्वेलरीप्रेमी बेळगावकरांच्या सेवेत सोने-चांदीच्या दागिन्यांच्या अनेक व्हरायटींनी समृद्ध आणि माफक किंमतीत दागिने उपलब्ध करून देण्यासाठी “कैश कुंज गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड” हे नवे दालन दाखल झाले आहे.
होय, गेल्या काही वर्षांत चोखंदळ बेळगावकरांच्या सुवर्णाभिरुचीत वाढ झाली आहे. हिरे, सोने-चांदीच्या दागिन्यांच्या व्यवसायात बेळगावात मागील काही वर्षांत मोठी उलाढाल होत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावकरांना विविध नाविन्यपूर्ण व्हरायटीचे आणि माफक किंमतीतील सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध करून देण्याच्या हेतूने प्रसिद्ध सुवर्णकार डॉ. गणेश शेट यांनी आपली प्रख्यात ज्वेलरी पेढी “कैश कुंज गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड”चे नवे दालन बेळगावात सुरु केले आहे. खडेबाजारातील मंगलदीप टेक्सटाईल शोरुमशेजारी ही नवी शोरूम प्रारंभ करण्यात आली आहे. आज शनिवारी सकाळी गदग-डंबळ येथील तोंटदाचार्य संस्थान मठाचे जगद्गुरू डॉ. सिद्धराम स्वामीजींच्या हस्ते या शोरुमचे एका शानदार सोहळ्यात उदघाटन करण्यात आले.

यासंदर्भात इन न्यूजला माहिती देताना “कैश कुंज गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड”चे संचालक डॉ. गणेश शेट यांनी सांगितले की, १९७५ मध्ये आमच्या पेढीची स्थापना करण्यात आली असून, राज्यात जिल्हा स्तरावर १२ शोरूम आहेत. नवनवीन डिझाइन्सचे उच्च गुणवत्तेचे दर्जेदार सोन्याचांदीचे दागिने उपलब्ध करून देत आम्ही ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. आमची स्वतःची दागिने उत्पादन कार्यशाळा आहे. सुमारे ८०० कामगार दागिन्यांच्या घडणावळीत गुंतलेले असतात. आमच्या पेढीत बनवलेले सर्व दागिने उच्च गुणवत्तेचे आणि ९१६ हॉलमार्क प्राप्त असतात. लवकरच यवसायाचा आणखी विस्तार करण्याचे नियोजन असून, राज्यभरात तालुका स्तरावर १२५ शाखा सुरु करण्यात येणार आहेत.
बेळगावातही शोरूम सुरु करण्याचा ग्राहकांचा आग्रह होता. त्यानुसार आज बेळगाव शाखेचा शुभारंभ केला आहे. या शाखेत दरमहा १ हजार ते २५ हजार रूपये हप्ता भरून वर्ष पूर्ण झाल्यावर ग्राहकाच्या आवडीनिवडीनुसार तेवढ्या किंमतीचे दागिने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याशिवाय २०% सवलत आणि बक्षीस योजनाही सुरु केली आहे. ग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

गदग-डंबळ येथील तोंटदाचार्य संस्थान मठाचे जगद्गुरू डॉ. सिद्धराम स्वामीजी यांनी बेळगावात केजीबी शोरूम सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून सांगितले की, डॉ. गणेश शेट आणि त्यांचे सुपुत्र संतोष यांनी बेळगावात “कैश कुंज गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड”ची शोरूम सुरु केली ही बेळगाव शहरासाठी भूषणावह बाब आहे. सोन्याचांदीचे विविध व्हरायटीचे दागिने व अन्य ज्वेलरी साहित्य ग्राहकांना माफक दरात उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. आधुनिक शैलीचे तसेच पारंपरिक दागिने खरेदी करण्याची संधी बेळगावकरांना यामुळे मिळणार आहे. त्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करून त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, कैश कुंज गोल्ड प्रायव्हेट लिमिटेडच्या शोरूमच्या उदघाटनानिमित्त श्री सत्य गणपती, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती पूजा आयोजित केली होती. यावेळी संचालक डॉ. गणेश शेट व सौ. सरोजा, रश्मी व संतोष शेट, श्रीगंध शेट, संदेश रायकर, सूरज रायकर यांच्यासह शेट कुटुंबीय, मित्रमंडळी, निमंत्रित आदी उपस्थित होते.


Recent Comments