Belagavi

घराच्या छतावर पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करा : प्रसाद चौगुले

Share

उन्हाळा सुरू झाल्याने पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने प्रत्येकाने आपल्या घराच्या छतावर पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी केले आहे.

सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी सदाशिव नगर शेवटचा क्रॉस येथील आपल्या घराच्या छतावर पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. उन्हाळा सुरू झाल्याने पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने प्रत्येकाने आपल्या घराच्या छतावर पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. होळी-रंगपंचमीत पाणी वाया घालवण्यापेक्षा पक्ष्यांसाठी पाणी द्या, अशी विनंती त्यांनी सोशल मीडिया द्वारेही केली होती.

प्रसाद चौगुले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षांना पिण्यासाठी पाणी ठेवण्याची मोहीम त्यांच्या मित्रांनी राबवली आहे. अश्विन पुराणिक, विजय करडी, योगेश शहापूरकर, अभिषेक मठपती व इतर मित्रांनी हा उपक्रम राबवला आहे.

Tags: