बेळगाव लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर सविता कांबळे यांच्या घरी भेट दिली.
महानगरपालिकेच्या महापौर सविता कांबळे यांच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी भाजपचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भेट देऊन लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली.
यावेळी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके, भाजप बेळगाव महानगर जिल्हाध्यक्षा गीता सुतार, जिल्हा सरचिटणीस राजशेखर डोणी आदी मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments