बैलहोंगल शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही माता दुर्गा परमेश्वरी जत्रा महोत्सव मोठ्या थाटात संपन्न होणार आहे, असे वेदमूर्ती महांतय्या शास्त्री आराधीमठ यांनी सांगितले.

बैलहोंगल शहरात प्रसारमाध्यमांशी बोलताना महांतय्या शास्त्री आराधीमठ म्हणाले की, यावर्षीही माता दुर्गा परमेश्वरी जत्रा महोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे. 12 ते 16 एप्रिल या कालावधीत जत्रा महोत्सव होणार आहे. पहिल्या दिवशी कुंकुमार्चन व अभिषेक होईल. त्यानंतर चंडिका होम, नवग्रहमंडल पूजन आदी धार्मिक विधी करण्यात येणार आहेत. दुर्गा परमेश्वरी जत्रेत शांभवी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. जत्रा महोत्सवासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले.


Recent Comments