अचानक एका गॅरेजला आणि कारला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना चिक्कोडी शहरातील डंबळ प्लॉट येथे घडली आहे .

हे गॅरेज जावेद गवंडी यांचे आहे. या गॅरेजला अचानक आग लागली. आग शेजारील कारमध्ये पसरली. तसेच गॅरेजमधील लाखो रुपयांचे सुटे भाग व भंगार साहित्य जळून खाक झाले. शेजारील शेतजमिनीतही आग पसरली आहे.

यावेळी लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीवर नियंत्रण मिळवता न आल्याने चिक्कोडी अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तासाभरानंतर आग आटोक्यात आणली.


Recent Comments