Belagavi

रमेश जारकीहोळी-शेट्टर यांच्यात निवडणुकीच्या रणनीतीवर महत्वपूर्ण खल

Share

अद्याप उमेदवारी अर्ज दाखल झाले नसले तरी बेळगाव लोकसभा मतदार संघात शह-काटशहाचे राजकारण वेग घेऊ लागले आहे. एकीकडे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सतीश जारकीहोळी यांच्यासह गोकाक भाग आज पिंजून काढला तर आ. रमेश जारकीहोळी यांनी जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन पुढील रणनीतीवर चर्चा केली.

उमेदवारी अर्ज भरण्यास अजून अवकाश असतानाच बेळगाव लोकसभा मतदार संघात शह-काटशहाचे राजकारण वेग घेऊ लागले आहे. महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपले पुत्र व काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारासाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासमवेत गुरुवारी गोकाक परिसर पिंजून काढला. तर दुसरीकडे त्यांचे पारंपरिक शत्रू मानले जाणारे माजी मंत्री व गोकाकचे आ. रमेश जारकीहोळी यांनी बेळगावात भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली.

खा. मंगल अंगडी यांच्या सदाशिवनगरातील निवासस्थानी रमेश जारकीहोळी यांनी शेट्टर यांची भेट घेऊन त्यांचा भगवी शाल घालून सत्कार केला. त्यानंतर उभय नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर खल करण्यात आला. यावेळी भाजा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, ओबीसी मोर्चाचे माजी राज्य सचिव किरण जाधव, महानगर भाजप सरचिटणीस मुरुगेन्द्रगौडा पाटील उपस्थित होते.

Tags: