Dharwad

आरएफओ महेश हिरेमठ यांच्या घर, कार्यालयावर लोकायुक्तांचा छापा

Share

लोकायुक्तांनी आज पहाटेच्या सुमारास धारवाड वनविभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यांच्या घरावर छापा टाकून महत्त्वाची कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली.

मुकांबिका नगर, कुमारेश्वर वसाहत, धारवाड येथील रहिवासी आरएफओ महेश हिरेमठ यांच्या घर आणि कार्यालयावर लोकायुक्त पथकाने आज बुधवारी पहाटे छापा टाकला. त्यानंतर तपासणी सुरू केली आहे. या छाप्याचे नेतृत्व लोकायुक्त एसपी शंकर रागी यांनी केले आणि कागदपत्रांची पडताळणी सुरु केली. छाप्याची कारवाई अजूनही सुरूच आहे.

Tags: