Belagavi

विविध स्वयंसेवी संस्थांकडून मलप्रभा नदीची स्वच्छता

Share

‘जागतिक जल दिना’निमित्त आज ‘ऑपरेशन मदत’ ग्रुप अंतर्गत बेळगाव आणि खानापूरच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन खानापूरची जीवनवाहिनी असलेल्या मलप्रभा नदीची स्वच्छता केली.

या दिवशी 22 मार्च 2024 रोजी सर्वत्र ‘जागतिक जल दिन’ साजरा केला जात आहे, यानिमित्त ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपने बेळगाव व खानापूर येथील सर्व संस्थांना स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले व पुढाकार घेतला. त्यानुसार लायन्स क्लब ऑफ खानापूर, इनरव्हील क्लब खानापूर, आरएसएस अँड योगा क्लब खानापूर, बार असोसिएशन खानापूर, एक्स-आर्मी असोसिएशन, जेष्ठ नागरिक संघ, क्षत्रिय मराठा परिषद, नागरिक मंच खानापूर, नितीन पाटील फिटनेस क्लब, ट्रेड युनियन आदी संघटनांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

संघटनांच्या कार्यकर्त्यांनी असोगा येथील रामलिंग देवस्थान येथे मलप्रभा नदीपात्र व परिसराची स्वच्छता केली. या ठिकाणी पसरलेल्या विषारी पदार्थांमुळे नदी प्रदूषित होऊ नये, यासाठी जागतिक जलदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.
भविष्यात मलप्रभा नदी-घाटावर येणाऱ्या भाविकांना सर्व संघटनांना विनंती की, नदीच्या पात्रात प्लास्टिकचा कचरा, जुने कपडे, नको असलेले देवाचे फोटो, पूजा साहित्य, निर्माल्य टाकून नदी प्रदूषित करू नये, तसेच ‘ऑपरेशन मदत’ ग्रुप खानापूर नदीकाठच्या ग्रामस्थांनी त्यांच्या सांडपाण्यावर आणि औद्योगिक विषारी पाण्यावर प्रक्रिया करून ते नदीपात्रात सोडण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत लवकरच नियमावली बनवण्यासाठी खानापूर नगरपालिका व स्थानिक ग्रामपंचायतींना निवेदन देण्यात येणार आहे. खानापूरच्या प्रत्येक सामाजिक संस्थेने तसेच सर्व नागरिकांनी आपली मलप्रभा नदी स्वच्छ ठेवण्यासाठी सहभागी व्हावे, असे सुचवले आहे.

या नदी स्वच्छता मोहिमेत कॅप्टन नितीन धोंड, राहुल पाटील, भाऊराव चव्हाण, अजित पाटील, सागर उप्पीन, प्रकाश बेटगुड, शिल्पा कल्याणी, समृद्धी सुळकर, सुभाष देशपांडे, गंधाली देशपांडे, गणपत गावडे, मदन सरदेसाई, श्रावणी सरदेसाई, सृष्टी सरदेसाई, शौर्य सरदेसाई, बाळकृष्ण बलकाटी, अर्जुन कदम, अरविंद कुलकर्णी, अच्युत कुलकर्णी, लगमप्पा नेरलगी व विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Tags: